अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील देवळी गावाजवळ महावितरण कंपनीच्या विद्यूततार आणि ट्रान्सफार्मरमधील ९० लीटर ऑईल असा एकुण १ लाख ९ हजार रूपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील देवळी गावाजवळ महावितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर आणि विद्यूत तारा ठेवण्यात आलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी १ लाख ९ हजार रूपये किंमतीचे विद्यूतसाठी लागणारे तांब्याचे तार आणि ट्रान्सफार्मर मधील ऑईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आले आहे. हा प्रकार महावितरण कंपनीच्या प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात संपुर्ण माहिती घेतली. परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर कंपनीचे कर्मचारी सुनिल शालीग्राम पाटील वय ५१ रा. देशमुख बंगला, अमळनेर यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.