Home amalner मारवड येथे ‘वाट माहेरची’ कार्यक्रमाचे आयोजन

मारवड येथे ‘वाट माहेरची’ कार्यक्रमाचे आयोजन

0
117


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मारवड येथी ज्ञानदेव मुक्ताई गृपच्या वतीने सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी वाट माहेरची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मारवड येथे माय माहेरच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्वच माहेरवाशिणींना एकत्र बोलावुन मारवड येथिल माहेरवाशिण तसेच मारवडला शिकण्यासाठी आलेल्या सर्व सखींना एकत्र भेटण्याचा आनंददायी योग सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी वाट माहेरची ‘ हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

कार्यक्रमातील रॅलित विविध कर्तबगार महिलांच्या वेशभूषा साकारल्या जाणार आहेत. सु.हि. मुंदडे हायस्कुल च्या प्रांगणात सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कथाकथन, नृत्य, कलागुणदर्शन, व लकी ड्रॉ आदींचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने माय माहेरच्या आठवणी व बालपणीच्या सर्व मैत्रिणिंना भेटण्याचा दुग्धशर्करा योग येणार असल्याने माहेरवाशिणींकडून कार्यक्रमास भरगच्च प्रतिसाद मिळत आहे. कार्यकमाच्या यशस्वितेसाठी ज्ञानदेव मुक्ताई, ग्रुप मारवड यांचेतर्फे नियोजन केले आहे.


Protected Content

Play sound