Home धर्म-समाज अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीसाठी आ. शिरीषदादांची धाव !

अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीसाठी आ. शिरीषदादांची धाव !


रावेर/यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील साखर कारखाना ते हंबर्डे दरम्यान एका व्यक्तीचा आज दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान अपघात झाला होता. तेथूनच रावेर तालुक्याचे आमदार शिरीषदादा चौधरी सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला जात होते.

त्या व्यक्तीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून आमदारांनी गाडीतून फर्स्ट एड किट काढून त्या व्यक्तीचे ड्रेसिंग केली व पुढील उपचारासाठी दाखल केले. संबंधित व्यक्तीचे नाव बंगाली डॉक्टर आहे अशी माहिती मिळाली आहे.


Protected Content

Play sound