जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील बेंडाळे चौकातील फटाक्यांचे दुकान फोडून दुकानातून 39 हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना बुधवारी 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता समोर आले आहे. याप्रकरणी रात्री आठ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शब्बीर मन्सूर आली राजकोटवाला वय 43, रा. पंचमुखी हनुमान मंदिर जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून बेंडाळे चौकात त्यांचे फटाके विक्रीचे दुकान आहे. 30 ऑक्टोबर रात्री 10 ते 30 ऑक्टोबर सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांचे दुकान बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे खिडकीचे लोखंडी ग्रील कापून आज प्रवेश करत दुकानात ठेवलेले 39 हजार रुपयांची रोकड चोरून गेले ही घटना बुधवारी 30 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता समोर आली. या संदर्भात रात्री 8.30 वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी हे करीत आहे.