Home Cities अमळनेर प्रादेशिक सेनेमध्ये भरतीचे आमिष दाखवत तरूणाची साडेतीन लाखांची फसवणूक

प्रादेशिक सेनेमध्ये भरतीचे आमिष दाखवत तरूणाची साडेतीन लाखांची फसवणूक

0
54


अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रादेशिक सेनेमध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून अमळनेर येथील तरूणाची ३ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी २२ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की समाधान सुखदेव पाटील रा. अमळनेर हा तरूण आपल्या आईसह वास्तव्याला आहे. जानेवारी २०२२ मध्ये अमळनेरात एका करियर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी समाधान पाटील हा तरुण देखील तेथे गेला होता. त्याला विलास धर्माजी पांडव, सुलोचना विलास पांडव, दीपक विलास पांडव व सचिन मधुकर केदारे ( सर्व रा. त्रिमूर्ती चौक नाशिक) हे भेटले. त्यावेळी विलास पांडव यांनी त्याला प्रादेशिक सेनेमध्ये भरती होण्याचा सल्ला दिला. त्यासाठी नाशिक येथे ६ महिन्यांचा निवासी प्रशिक्षण व मार्गदर्शन कोर्स करावा लागतो. खाण्यापिण्यासह सर्व खर्च ४ लाख रुपये आहे. मात्र एकरकमी रक्कम दिल्यास ५० हजाराची सूट दिली जाईल, असा विश्वास दिला. विलास पांडव याने तरुणाला खात्री पटावी म्हणून महार रेजिमेंट सागर मध्यप्रदेश येथे बोलावून घेतले. आणि तेथील मार्गदर्शन केलेल्या उमेदवारांना वेगवेगळ्या पदावर नोकरी मिळाली म्हणून भासवले. म्हणून विलास पाडंव व त्याचा भाचा सचिन केदारे यांच्या फोन पे वर खात्यावर साडेतीन लाख रुपये टाकले. मात्र अनेक महिने उलटून गेल्यावरही आम्हाला प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले नाही. लवकरच प्रशिक्षण सुरू होईल असे प्रत्येकवेळी सांगितले गेले. अखेरीस १४ एप्रिल २०२३ रोजी समाधान व त्याचा मित्र नाशिक येथे त्यांच्या घरी गेले असता विलास याने तुम्हाला प्रशिक्षण देणार नाही तसेच तुमचे पैसे परत करणार नाही. तुम्ही आमच्याकडे पैसे मागितले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही. आणि सुलोचना हिने जर पैसे मागायला आले तर तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली. अखेरीस समाधान याने उशीरा अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून विलास धर्माजी पांडव, सुलोचना विलास पांडव, दीपक विलास पांडव व सचिन मधुकर केदारे ( सर्व रा. त्रिमूर्ती चौक नाशिक) चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत.


Protected Content

Play sound