अखिल भारतीय संत समितीची समन्वय बैठक

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | हिंदूंनी समाजातील जाती जातीत असलेले भेदाभेद दूर करून संघटित होऊन एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत अखिल भारतीय संत समितीच्या महाराष्ट्र प्रदेश बैठकीत संतांनी व्यक्त केले. दि. २० व २१ ऑक्टोबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश बैठक वढोदा, फैजपूर येथील श्री निष्कलंक धाम तुलसी हेल्थ केअर सेंटर मध्ये पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून सर्व संप्रदायाचे प्रमुख प्रतिनिधी संत उपस्थित होते.

अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी उपस्थितांना संबोधन केले. त्यांनी सांगितले की, हिंदू समाजामध्ये सर्वजण सण उत्सव साजरे करतात मात्र जाती-जातीत अंतर्गत भेदाभेद असल्याने ते एकमेकांपासून दूर गेली आहे. देव, देश, धर्म रक्षणासाठी, गौ मातेच्या संरक्षणासाठी अनिष्ट रूढी परंपरा बंद करून सर्वांनी हातात हात घेऊन एकत्रपणे प्रामाणिकपणे देशासाठी काम केले पाहिजे. हिंदूंवर होणारे अन्याय, अत्याचार दूर झाले पाहिजे. आपण हिंदू आहोत हा एकच ध्यास घेऊन सर्वांनी एकत्रित येऊन समाज व देश वाचविणे हा आपला सर्वांचा धर्म आहे.

या बैठकीला अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज, प पू अमृताश्रम दंडी स्वामी महाराज, प. पू. सुरेश शास्त्री मानेकर बाबा, महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती जी महाराज यांचे सह १२७ परंपरेचे संत महंत उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश साठी काही संतांची निवड करण्यात आली. परमपूज्य अमृताश्रम दंडी स्वामी महाराज – संरक्षक, जामनेर गुरुदेव सेवाश्रमचे गादीपती श्री श्याम चैतन्यजी महाराज – कोषाध्यक्ष, हभप विश्वनाथ महाराज वारिंगे – संघटन मंत्री, प. पू. शिवरूपानंदजी महाराज – कोकण प्रांत सहमंत्री, ह भ प रविंद्र महाराज हरणे – मार्गदर्शक मंडळ, प. पु. आचार्य सुरेश शास्त्री मानेकर बाबा – मार्गदर्शक मंडळ, हभप संतोषानंदजी महाराज – पश्चिम महाराष्ट्र सहमंत्री, स्वामी विश्व चैतन्यजी महाराज, हभप सुदर्शनजी महाराज, हभप मधु माऊली महाराज, प.पू. परमेश्वरजी महाराज – शिंदखेडा प्रदेश मार्गदर्शक मंडळ, प.पू. विजयराज बाळापूरकर महानुभाव, प. पू. श्याम नारायणदास महाराज – विदर्भ प्रांत सहमंत्री यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे. समन्वय बैठकीचे सूत्रसंचालन गुरुदेव सेवाश्रमचे गादीपती प. पू. श्री श्याम चैतन्यजी महाराज तर आभार कन्नड आश्रमाचे प. पू. सर्वचैतन्य महाराज यांनी मानले.

Protected Content