लग्नाचे आमिष दाखवत अत्याचारातून तरूणी गर्भवती; दोघांवर गुन्हा दाखल !

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ठाणे जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत केलेल्या अत्याचारातून गर्भवती करत लग्नास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात धनराज अवदेष पासवान वय-२० या तरुणाची ओळख ठाणे जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणीची झाली मार्च २०२२ ते १४ ऑक्टोबर २०२४च्या दरम्यान धनराज याने पीडित तरुणीला लग्नाची आमिष दाखविले, तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित तरुणी ही गर्भवती राहिली. त्यानंतर तरुणीने लग्नासाठी मागणी केली असता धनराज पासवान व त्याची आई दुर्गा पासवान यांनी पीडित तरुणीला गर्भपात सल्ला दिला दरम्यान तरुणीने गर्भपात करण्यास नकार दिल्याने, तिला शिवीगाळ करत लग्न न करण्याची धमकी दिली. दरम्यान पिडीत तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धावघेवून तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी धनराज अवदेष पासवान वय-२० आणि दुर्गा पासवान दोन्ही रा. कुसुंबा ता.जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास स.पो.नि. माधुरी बोरसे करीत आहे.

Protected Content