Home Cities धरणगाव अखिल भारतीय माळी महासंघाची कार्यकारिणी जाहीर

अखिल भारतीय माळी महासंघाची कार्यकारिणी जाहीर

0
74

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष नितीन शेलार यांच्या सूचनेनुसार उत्तर महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष भूषण महाजन व युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल महाजन यांचा मार्गदर्शनाखाली कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. युवक तालुकाध्यक्ष किरण महाजन यांनी धरणगाव येथे माळी समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाज बांधवांची माळी महासंघाच्या विविध आघाड्यांसाठी युवक कार्यकारणी घोषित करण्यात आली.

कार्यकारिणी जाहीर
निलेश महाले युवक तालुका सरचिटणीस, पवन राजू महाजन व्यापारी आघाडी उपतालुका अध्यक्ष, अंकित महाजन तालुका प्रसिद्धीप्रमुख, भरत महाजन समन्वयक उपतालुका अध्यक्ष, राजेश महाजन शहराध्यक्ष प्रणव माळी सोशल मीडिया प्रमुख, चेतन महाजन तालुका प्रचारक, महेश वाघ, कुस्ती मलविद्या आघाडी तालुकाध्यक्ष, चेतन जिजाबराव महाजन कुस्ती मलविद्या शहराध्यक्ष, विजय जाधव व्यापारी आघाडी शहर प्रमुख, हेमंत महाजन व्यापारी आघाडी तालुका अध्यक्ष, विजय महाजन व्यापारी आघाडी तालुका उपाध्यक्ष, शुभम गुलाब महाजन शेतकरी आघाडी उप तालुका अध्यक्ष, हेमराज कांतीलाल महाजन कामगार आघाडी तालुका अध्यक्ष, दिगंबर महाजन, सोशल मीडिया शहर प्रमुख, गणेश महाजन उप तालुका संघटक, राहुल महाजन समन्वयक तालुकाध्यक्ष पदी निवडी करण्यात आल्या.

प्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भूषण महाजन, युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल महाजन, सदस्य आबा माळी, समाधान माळी, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक महाजन तर आभार निलेश महाले यांनी मानले.


Protected Content

Play sound