मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुक्ताईनगर येथे दौरा असून सायंकाळी त्यांची मुक्ताई चौकातील मोकळ्या पटांगणात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील हे कोणत्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहे, यांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून मुक्ताईनगर बोदवड विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीच्या माध्यमातून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे कोणत्या पक्षाचे चिन्ह घेवून निवडणूक लढविणार आहे, याची जोरदार चर्चा सुरू होता, काहींनी आमदार पाटील हे भाजप पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे देखील बोलले जात होते. परंतू आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुक्ताईनगर येथे प्रचार दौऱ्यांच्या निमित्ताने येत असून या सभेतूनच जनतेच्या प्रश्नचिन्हाला पुर्णविराम मिळणार आहे. आमदार चंद्रकांत पाटील हे धनुष्यबाण की कमळ याबाबत निश्चित केले जाणार आहे. आज सायंकाळी मुक्ताई चौकातील मोकळ्या पटांगणात ही सभा होणार आहे. यातूनच सर्व समिकरण बदलणार असल्याचे दिसून येणार आहे.