नांदेडमध्ये भाजपला धक्का; माजी आमदारांचा स्वराज्य पक्षात प्रवेश

नांदेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. देगलूरचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे.

सुभाष साबणे हे मुळ शिवसेना पक्षाचे असून ते १९९९, २००४, २०१४ च्या निवडणूकीत विजय होऊन देगलूरचे आमदार बनले होते. त्यांनी २०१९ साली शिवसेना सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि देगलूरची पोटनिवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा जितेंद्र अंतापुरकर यांनी पराभव झाला होता.

आता जितेंद्र अंतापुरकर यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांची भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे शनिवारी त्यांनी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, लाडकी बहीण योजना समिती अध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती सदस्य या तिन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. आता सुभाष साबणे यांच्या स्वराज्य पक्षात प्रवेश झाल्याने आता महाराष्ट्रातील तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्तीची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.

Protected Content