भाजपच्या पहिल्या यादीत इतक्या महिला उमेदवारांना संधी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये ९९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून १३ महिलांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. यात महत्वाचे नाव अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांचे आहे. त्या भोकर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहे.

भाजपच्या यादीत महिलांचा समावेश पुढीलप्रमाणे-
१. श्रीजया अशोक चव्हाण – भोकर
२. अनुराधा अतुल चव्हाण – फुलंब्री
३. सीमाताई महेश हिरे – नाशिक पश्चिम
४. सुलभा गायकवाड – कल्याण पूर्व
५. मंदा विजय म्हात्रे – बेलापूर
६. मनीषा अशोक चौधरी – दहिसर
७. विद्या ठाकूर – गोरेगांव
८. माधुरी सतीश मिसाळ – पर्वती
९. मोनिका राजीव राजळे – शेगांव
१०. प्रतिभा पाचपुते – श्रीगोंदा
११. नमिता मुंदडा – केज
१२. मेघना बोर्डिकर – जिंतूर
१३. श्वेता विद्याधर महाले- चिखली

Protected Content