मासुमवाडी परिसरातून तीन गायींची चोरी

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मासुमवाडी परिसरातून तीन गायींची चोरी केल्याची घटना गुरूवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, अफसर खान जाकीर खान वय २३ रा. कासमवाडी ता.जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. भंगार खरेदी व विक्री करण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मालकीच्या असलेल्या तीन गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरूवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता मासुमवाडी समोर आली आहे. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी गायींचा शोध घेतला परंतू काहीही माहिती मिळाली नाही. अखेर रात्री ९ वाजता त्यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील हे करीत आहे.

Protected Content