Home Cities जळगाव शरद पवार गटांच्या ओबीसी सेलच्या युवक शहराध्यक्षपदी विशाल देशमुख

शरद पवार गटांच्या ओबीसी सेलच्या युवक शहराध्यक्षपदी विशाल देशमुख


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील रामेश्वर कॉलनी परिसरातील विचार वारसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटच्या ओबीसी सेलच्या युवक शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी त्यांना निवडीचे नुकतेच पत्र दिले आहे.

विशाल देशमुख यांनी मेहरुण परिसरामध्ये विचार वारसा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात सामाजिक कार्य केले आहे. तसेच विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी तरुणांसह महिला व कामगारांना देखील मदत करून दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या युवक शहराध्यक्षपदी निवड केली आहे.

विविध आरोग्य तपासणीच्या माध्यमातून विशाल देशमुख यांनी नागरिकांना आरोग्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे. एका भेटीमध्ये त्यांनी नुकतेच त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.यावेळी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष वाल्मिक पवार,अशोक पाटिल ,रमेश बहारे आदी उपस्थित होते विशाल देशमुख यांच्या निवडीबद्दल त्यांचे जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound