जळगावात रिफॉर्मेशन बुध्दिबळ स्पर्धा – २०२४ उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रिफॉर्मेशन फाउंडेशन कडून मागिल तीन वर्षापासून क्रिकेट टूर्नामेंटच्या आयोजन समाजासाठी वेगवेगळ्या मुद्दे म्हणून पहिल्या वर्षी नशा मुखालिफ टूर्नामेंट, दुसऱ्या वर्षी आत्महत्या मुक्त समाज आणि या वर्षी देखील काही वेगळा केले जात आहे. यावर्षी रिफॉर्मेशन संस्थेमार्फत बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा फक्त शाळकरी मुलांसाठी होती. या स्पर्धेत ९, ११, १३ आणि १५ वर्ष आतील खेळाडूंचे गट तयार करण्यात आले होते सदर स्पर्धेत ९० विद्यार्थ्यांच्या सहभाग नोंदविले. ज्यात बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थीनी हे मनपा शाळेचे होते तर काही खाजगी शाळेतील होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख साहेब यांच्या हस्ते करण्यात आले तर पारितोषिक वितरण समारंभात वसीम बापू, मतीन पटेल, जमीर नागोरी यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य पंच म्हणून जिल्हा चेस असोसिएशन व इंटर नॅशनल आरबिटर श्री प्रवीण ठाकरे सर सोबत सोमवंशी सर यांनी काम पाहिले. सदर स्पर्धेसाठी मनपाचे शिक्षक हिदायत खाटीक सर यांचे विशेष सहकार्य लाभले.

सदर स्पर्धेचे यशस्वीतेसाठी रिफॉर्मशन कप टीमचे रेहान सर, आमिर शेख, शारीक शेख, अल्फैज पटेल, जकी अहमद, शोएब बागवान, अमीर पटेल, अजहर खान, आसिफ देशमुख, अब्दुल रहमान मणियार, सैफ अली, यांनी परिश्रम घेतले.

अंतिम निकाल खालीलप्रमाणे :

९ वर्ष वय गट :
१. शेख दानियाल – मनपा ५६
२. शेख अरहम – सेंट टेरेसा

११ वर्ष वय गट :
१.खाटिक जकरिया – मनपा ५६
२. शेख इनाया – मनपा १०
३. शेख जैनुल – मनपा ५६
४. खान अहमद – मनपा १३

१३ वर्ष वय गट :
१. शेख अश्मीजान – मनपा ३६
२. खाटिक यहया – मनपा ३६
३. खाटिक बुशरा – मनपा ३६
४. पटेल नाजमिन – मनपा ३६

१५ वर्ष वय गट :
१. खान अलफरान – मनपा माध्य.१
२. शेख जैद – इकरा शाहीन

Protected Content