वाचक प्रेरणा दिनाच्या पुर्वसंध्येला आयएमआरतर्फे “वाचन संस्कृती वर बेविनार

 

जळगाव, प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, निरंतर शिक्षण विभाग आणि केसीईचे आयएमआर कॉलेज तसेच व. वा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील बेविनार” नव्या पिढीची वाचन संस्कृती” दि १४ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत आॅनलाईन आयोजित करण्यात आले आहे.

या बेविनारचे उद्घाटन एफटिआय चे सदस्य आणि माजी प्राचार्य नरेंद्र पाठक करणार असुन या बेविनारसाठी प्रमुख वक्त्या, बेस्ट सेलर लेखका दिपा देशमुख असतील तसेच प्रसिद्ध कवी आणि आॅनलाईन मिसामासिक संपादक उत्पल व बा हे असतील. आतापर्यत या बेविनार साठी ३०० वाचक आणि रसिकांनी देशभरातून आॅनलाईन नोंदणी केली आहे. त्यात प्रामुख्याने गोवा, नागपूर, नाशिक, पुणे येथुन नोंदणी झाली आहे. नोंदणीसाठी देण्यात आलेली लिंक

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeuy26exV6fhQkp_JU89GMJrf_8pPkEQqxpEZ9FTEC31vpA5A/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0&gxids=7628

या बेविनारचे सर्टिफिकेट लगेचच वाचकांच्या मेलवर पाठवले जाणार आहे. सध्या वाचनालये बंद असलीत तरी व. वा वाचनालयाच्या सदस्य वाचकांनी मोठ्या प्रमाणात या वेबीनारमध्ये नोंदणी करुन कार्यक्रमाचा आणि लेखकांच्या भेटीचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहेत. तसेच विद्यापिठस्तरावर निरंतर शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. मनिष जोशी आणि आयएमआरच्या डायरेक्टर प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. शमा सराफ यांनी बेविनारचा आॅनलाईन आस्वाद घेण्याचे आवाहन केले आहे.

Protected Content