महिला सशक्तीकरणासाठी महायुती सरकारने घेतली महत्त्वपूर्ण निर्णय- अमोल जावळे

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महायुती सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी विविध योजना आणल्या आहेत. त्यापैकी एक “लाडकी बहीण योजना” आहे, जी महिलांसाठी कायमस्वरूपी लाभ देणारी आहे. महायुती सरकारने महिला बचतगट आर्थिक सक्षम करण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, असे भाजपा जिल्हाध्यक्ष अमोलभाऊ जावळे यांनी सांगितले.

रावेर शहरातील माजी सैनिक हॉलमध्ये ऑनलाइन घेतलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा तसेच बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जावळे बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे प्रमुख उपस्थित होत्या. या रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक स्नेहल बोंडे (कळमोदे), द्वितीय क्रमांक संध्या पाटील (तामसवाडी) आणि तृतीय क्रमांक रुपाली महाजन (सावखेडा) यांनी मिळवला. विजेत्यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होता, ज्यामुळे कार्यक्रमाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कार्यक्रमात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, श्रीकांत महाजन, रावेर लोकसभा संयोजक सुनिल पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस हरलाल कोळी, भाजपा तालुकाध्यक्ष महेश चौधरी, भरत महाजन, भाजपा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र लासुरकर, भाजपा शहर उपाध्यक्ष अरूण शिंदे, पद्माकर महाजन, भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह अनेक बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष महेश चौधरी म्हणाले महायुती सरकारने महिलांसाठी आणलेल्या विविध योजनांमुळे महिलांच्या सशक्तीकरणाला गती मिळाली आहे. “लाडकी बहीन योजना” आणि महिला बचतगटांसाठी घेतलेले निर्णय महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

Protected Content