शेतातील पत्र्याच्या शेडमधून कापसाची चोरी

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील हेडगेवार शिवारामधील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले ४० हजार रूपये किंमतीचा कापूस चोरून नेल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी साडेबारा वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुधीर गोकुळे धनगर वय ३८ रा. धनगर गल्ली, धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे धरणगाव तालुक्यातील हेडगेवार शिवारातील शेतातून पत्र्याच्या शेडमध्ये शेतातील कापूस ठेवण्यात आला होता. ३० सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास धर्मा आत्माराम धनगर रा. धनगर गल्ली धरणगाव, दिलीप पावरा आणि देवराम पावरा (दोघांचे नाव पत्ता माहित नाही) यांनी चोरून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर सुधीर धनगर यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार शनिवार १२ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुधीर चौधरी हे करीत आहे.

Protected Content