डॉ.वर्षा पाटील यांचा वाढदिवस उल्हासित वातावरणात साजरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. डॉ. वर्षा पाटील यांना वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा देण्यासाठी अक्षरश: रिघ लागली होती. डॉ. वर्षा पाटील यांनी प्रत्येकांच्या शुभेच्छांचा मनापासून स्विकार केला.

गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध उपक्रम राबविण्यात आले. सकाळी निवासस्थानी डॉ. वर्षा पाटील यांचे औक्षण करण्यात आले. तसेच चिमुकल्या नाती कु. किवा आणि सारा यांच्या हस्ते केक कापण्यात आला. याप्रसंगी आधारस्तंभ असलेल्या गोदावरी आजी, अनिल पाटील, अलका पाटील, राधा नायर, राजेश साठे, अनंत साठे, सचिन पाटील यांच्यासह रूग्णालयातील सहकारी उपस्थित होते. डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात केळी या पिकाचे रोपण करण्यात आले. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, डॉ. अनिकेत पाटील, कृषी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एस.एम. पाटील, प्राचार्य अशोक चौधरी, शैलेश सपकाळे, रजिष्ट्रार अतुल बोंडे, मिलिंद तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या सारा सभागृहात सचिव डॉ. वर्षा पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. वर्षा पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला. याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील यांनी डॉ. वर्षा पाटील यांना केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, किवा पाटील, कु. सारा पाटील, डॉ. अनिकेत पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डॉ. माया आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, अन्नपूर्णालयमचे प्रमुख डी.टी. राव, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एच. पाटील, गोदावरी आयएमआर महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, रूग्णालयाचे प्रशासन अधिकारी एन.जी. चौधरी, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रवीण फालक,भिरूड परिवारातील नलिनी भिरूड, ज्योत्सना भिरूड, प्रशासन अधिकारी आशिष भिरूड, मंजुषा भिरूड, रेक्टर अर्चना भिरूड, संस्कृती भिरूड, सृष्टी भिरूड, निर्मीती भिरूड, डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाचे संचालक शिवानंद बिरादर, प्रा. पियुष वाघ, संकेत पाटील, नर्सिंग महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी प्रवीण कोल्हे, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी राहुल गिरी, वरीष्ठ लेखापाल योगेश पाटील, आयटी विभागाचे प्रमुख सुनील बोंडे, लेखापाल विकास बेंडाळे, किशोर झांबरे, रमाकांत पाटील, अजय वाणी, नीलेश नारखेडे, हेमंत बर्हाटे, महेश चौधरी, केतकी मेडिकोजचे प्रमुख नीलेश पाटील, जितेंद्र पाटील, प्रशासन अधिकारी अशोक भिडे, अस्थिरोग तज्ञ डॉ. दीपक अग्रवाल, नाक-कान-घसा तज्ञ डॉ. अनुश्री अग्रवाल, टी.व्ही. पाटील, खाचणे मामा, प्रशासकीय विभागाचे अनंत इंगळे, ग्रंथपाल गोपाळ भोळे, मिलींद पाटील, अमोल बोंडे, पंकज राणे, मिलींद सरोदे, ललित बोंडे, तुषार फेगडे, किशोर पाटील, नंदकिशोर शेळके, नरेंद्र नेमाडे, प्रवीण चुडीवाले, मनोज सोनार, मनिषा जोशी, रूपाली जंगले, श्रध्दा सावके, गुंजन भंगाळे, प्रिया शुक्ला, कांचन राणे, जान्हवी भिरूड, ज्योत्स्ना फेगडे, सुवर्णा बोरोले, अर्चना भोळे, दिपाली कोल्हे, लिना भोळे, प्रेरणा पाटील, सागर पाटील, राजेश पाटील, नीलेश पाटील, रितेश बोरोले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

Protected Content