रावेर(लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी):- रावेर महसूल विभागाने जप्त केलेली अवैध वाळू वाहतुकीतील ट्रॅक्टर ट्रॉलीचा आज जाहीर लिलाव करण्यात आला. यामध्ये नऊ लाख 79 हजार 821 रक्कम वसूल करण्यात आली आहे.
या बाबत वृत्त असे की दि.4 नऊ वाहनांचा लिलाव ठेवण्यात आला होता, त्यापैकी आज लिलावामध्ये आठ वाहनांचा लिलाव झाला असून एक वाहनाचा लिलावामध्ये कोणीही बोली बोली नसल्याने फक्त 8 वाहनांचा लिलाव करण्यात आला त्या आठ वाहनातुन लिलावाची रक्कम 9 लाख 79 हजार 821/- वसूल करण्यात आली आहे. ही कार्यवाही तहसिलदार बंडू कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार संजय तायडे,महसूल सहायक भूषण कांबळे यांनी लिलाव पद्धत राबवली.