वृध्द महिलेला शिवीगाळ करत धारदार वस्तूने वार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजी नगरातील ख्रिश्चन कब्रस्तानाजवळ किरकोळ कारणावरून वृध्द महिलेला शिवीगाळ करत धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी करून कुटुंबाला जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरूवार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगलाबाई लालचंद परदेशी वय ६२ या वृध्द महिला या मुलगा, सुन व नातवंडे यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. त्यांचा मोठा मुलगा गणेश परदेशी आणि सुन शारदा परदेशी हे नेहमी त्यांच्या सासरवाडीला जातात या कारणावरून सुरेंद्र परदेशी रा. शिवाजी नगर, जळगाव याने गुरूवार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता मंगलाबाई परदेशी यांना शिवाजी नगरातील ख्रिश्चन कब्रस्तानाजवळ दारूच्या नशेत येवून शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच धारदार वस्तूने वार करत गंभीर जखमी करून मुलगा, सुन व नातूला जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रात्री १० वाजता मंगलाबाई परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सुरेंद्र परदेशी यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिपक शिरसाठ हे करीत आहे.

Protected Content