Home क्राईम जमुना नगर परिसरातील तरूणाची दुचाकी लांबविली

जमुना नगर परिसरातील तरूणाची दुचाकी लांबविली


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जमुनानगर परिसरातून एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवार २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश देविदास लोंढे वय ३६ रा. जमुना नगर जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच ४८ बीएल ७२०३) ही घरासमोर पार्कींगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरूवार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार परीष जाधव हे करीत आहे.


Protected Content

Play sound