५ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पंतप्रधान येणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकांचे बिगुल आता येत्या काही दिवसांमध्ये वाजण्याची चर्चा असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा जाहीर झाला आहे. ५ ऑक्टोबरला मोदी महाराष्ट्रात येणार आहेत. यावेळी पीएम मोदी विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासोबतच ठाण्यामध्ये खास ‘लाडक्या बहिणींना’ भेटणार आहेत.

महिला सक्षमीकरण अभियानाच्या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ मध्ये त्यांचा हा पहिलाच थेट सहभाग असणार आहे. ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ही सीएम एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षी असताना त्यामध्ये पहिल्यांदाच मोदींचा सहभाग असणार आहे. त्यामुळे या दृष्टीने ठाण्यात आता तयारीला सुरूवात झाली आहे.

ठाण्यामध्ये कासारवडवली येथील वालावलकर मैदानावर हा मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.या अनुषंगाने ठाण्यामध्ये वाहतूक व्यवस्थेमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. 5 ऑक्टोबरच्या मोदींच्या महाराष्ट्र दौर्‍यामध्ये मेट्रो 3 चे उद्द्घाटन होणार आहे.तसेच ते नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ट्रायल लॅन्डिंग च्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत.

Protected Content