मंत्री अनिल पाटील यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा पाठिंबा

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघासोबत मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत समाज बांधवांनी मंत्री अनिल पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे.

समस्त चर्मकार महासंघाची बैठक नुकतीच घेण्यात आली यावेळी मंत्री ना. अनिल पाटील यांचे पाठीमागे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत खंबीरपणे उभा राहील, कारण चर्मकार समाजाला मंत्री पाटील यांनी खुप काही दिलेले आहे. त्याची उतराई यानिमित्ताने केली जाईल व समस्त चर्मकार संघ त्यांच्या पाठीमागे सदैव उभा राहील असा निर्णय घेण्यात आला.

यावेळी रविंद्र ठाकुर, महादु कार्लेकर, प्रविण पवार, बापु ठाकरे, अरुण चव्हाण, राजु अहिरे, भिकन कार्लेकर, भाईदास जाधव, प्रकाश अहिरे, गणेश दामोदर, संजय भामरे, पारस बन्सीलाल, आकाश कार्लेकर, मुकेश चव्हाण, दादु चव्हाण, दिपक चव्हाण, विकी अहिरे, विशाल अहिरे, कालु जाधव, राजु साळुंखे, सुरेश चव्हाण, रविंद्र कुलमाळी, सुरेश बन्सी, गणेश ठाकरे, गणेश जाधव, रघुनाथ झानरे, निलेश चव्हाण, प्रेम पवार, महेंद्र चव्हाण, दिपक अहिरे, रोहिदास जाधव, संतोष कार्लेकर यासह समाजबांधव उपस्थित होते.

Protected Content