जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात सोमवारी ३० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता महिला संवाद मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पक्षाचे उपनेते शितल देवरूखकर, शुभांगी पाटील, संपर्क संघटीका रितू वाघ, शिर्डी संपर्क प्रमुख शुभदा शिंदे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महिला मेळावा घेण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेना ठाकरे पक्षातील महिलांची चाचपणी केली जात आहे. पक्ष मजबुत करण्यासाठी महिलांशी संवाद साधला केला जात आहे. या मेळाव्याला उपनेते शितल देवरूखकर, शुभांगी पाटील, संपर्क संघटीका रितू वाघ, शिर्डी संपर्क प्रमुख शुभदा शिंदे यांनी जळगाव जिल्ह्यातील महिला कार्यकर्ता यांच्याशी संवाद साधला आहे. याप्रसंगी उपनेते शितल देवरूखकर म्हणाल्या की, आगामी काळात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवयाचे आहे. त्या दृष्टीने आपण सर्वांनी कामाला लागणे गरजेचे आहे. राज्यात वाढलेली महागाई, बेरोजगारी, महिलांवरील वाढते अत्याचार याचा उल्लेख करुन त्यांनी आपल्या खास शैलीत सत्ताधार्यांचा खरपूस समाचार घेतल्याचे पहायला मिळाले.
याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू भंगाळे, जळगाव जिल्हा सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हाध्यक्ष निलेश चौधरी, माजी महापौर जयश्री महाजन, विराज कावडीया, गिरीश कोल्हे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, यांनी जळगाव जिल्ह्यातील महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.