विजेच्या धक्क्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सावदा येथील एका ३५ वर्षीय तरूणाला केबल टाकण्याचे काम करत असतांना इलेक्ट्रिक शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी २९ सप्टेंबर रोजी घडली आहे. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पंकज विकास पाटील वय-३५, रा. जगमाता चौक, सावदा ता.रावेर असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, सावदा शहरातील जगमाता चौकात पंकज पाटील हा तरुण वास्तव्याला होता. रविवारी २९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता सुमारास पंकज पाटील हा सावदा शहरातील सोमेश्वर नगरात इलेक्ट्रिक केबल टाकण्याचे काम करत असताना काम करत असताना त्याला विजेचा धक्का लागला. त्यामुळे त्याला तातडीने शहरातील खाजगी रुग्णाला दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंतिम मयत घोषित केले. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय देवरे हे करीत आहे.

Protected Content