Home क्राईम धक्कादायक : फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार !

धक्कादायक : फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार !

0
97

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विवाहितेला तिचे फोटो, व्हिडीओ आणि कॉल रेकॉर्डींग व्हायरल करण्याची धमकी देवून तिच्यावर जबरी अत्याचार केला. एवढेच नाही तर शिवीगाळ करत पोलीसात तक्रार दिली तर परिवाराला संपवून टाकेल अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील एका भागात २८ वर्षीय विवाहिता ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. संशयित आरोपी तुषार उर्फ सागर बाबुराव बोरसे रा.चाळीसगाव याने विवाहितेचा पाठलाग करून तिला शारिरीक सुखाची मागणी केली. तसेच विवाहितेचे फोटो, व्हिडीओ आणि कॉल रेकॉर्डींग तिच्या पतीला पाठविण्याची धमकी दिली. त्यानंतर संशयित आरोपी तुषार बोरसे याने विवाहितेला दुचाकीवर बसवून मित्राच्या रूमवर अत्याचार केला. तसेच याबाबत कुणाला सांगितले किंवा पोलीसात तक्रार दिली तर परिवाराला जीवेठार मारेल अशी धमकी दिली. दरम्यान हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसारसंशयित आरोपी तुषार उर्फ सागर बाबुराव बोरसे यांच्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते हे करीत आहे.


Protected Content

Play sound