धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सालाबादा प्रमाणे ह्या वर्षीही श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाच्या वतीने वहना साठी बैलजोडी जुंपण्याचा जाहीर लिलाव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंदीरा समोरील पटांगणावर झालेल्या ह्या लिलावात जिल्हासह तालुका व शहर परीसरातील असंख्य नागरीक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष डि. आर. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातुन वहन उत्सवाची परंपरागत माहीती विषद केली ते म्हणाले की पंधरा दिवस चालत असलेल्या ह्या वहन उत्सवात सर्व समाज बांधवानी व भावीक भक्तानी सहभागी व्हावे व आपला हा उत्सव शांततेने व गुण्यागोविंदाने साजरा करण्याचे आवाहन केले त्या नंतर श्री बालाजी महाराज की जय असा जयघोषणेने लिलावास प्रारंभ करण्यात आला. ह्या वर्षी भाविक भक्तांचा अति उत्साह पहाता मागच्या वर्षा पेक्षा 71 हजार 399 रुपयाची वाढ दिसून आली मागच्या वर्षी 6 लाख 69 हजार 873 रुपये वहन लिलावाचे आले होते परंतु ह्या वर्षी 7लाख 41हजार 272 रुपये बैलजोडी लिलावाच्या माध्यमातुन देणगी मिळणार असुन वरील वाढ दिसुन येत आहे अतिशय श्रध्दास्थान म्हणुन या वहन लिलावात परीसरातील असंख्य नागरीक सामाजिक व राजकीय संघटना सांस्कृतिक मंडळे व व्यक्तिगत स्वरूपात बोली बोलण्याची स्पर्धा दिसुन आली
वहनास बैलजोडी जुंपण्याचा लिलाव खालील प्रमाणे 1)ध्वज वहन श्री गजाननाचे तेरा हजार एक रुपये,महात्मा फुले व्यायाम शाळा नितेश वासुदेव महाजन 2) हत्तिचे वहन सव्विस हजार एक,रुपये.रोहित वासुदेव पवार,3)सुर्याचे वहन, अठ्ठावीस हजार एक रुपये पवन देविदास महाजन,4) मोराचे वहन. पंचवीस हजार पाचशे एक रुपये. देविदास मांगो महाजन, 5) शेषाचे वहन बेचाळीस हजार एकशे एक रुपये.माऊली मंगल कार्यालय भूपेंद्र पाटील,6) घोड्याचे वहन सतरा हजार पांचशे एक्कावन रुपये,इच्छेश रविंद्र काबरा, 7)राजहंसाचे वहन एकोनावीस हजार एक रुपये सोनु पांडुरंग धनगर 8)दुर्गादेवीचे वहन एक्कावन हजार एक रुपये मुकेश रमणसिंह बयस,9) मारोतीचे वहन चार लाख पन्नास हजार रुपये स्वप्नील जगन्नाथ महाजन,जगन्नाथ पौलाद महाजन, 10)चंद्राचे वहन वीस हजार एक रुपये.एस के पाटील तसेच 1986धरणगाव कॉलेज बॅच, 11)गरुडाचे वहन सोळा हजार एक रुपये.जैन गल्ली मित्र मंडळ दिपक संचेती,12)अंगदाचे वहन सहा हजार एक रुपये रावसाहेब मगन पाटील,13) पांडव सभेचे वहन सत्तावीस हजार एकशे अकरा भानुदास शंकर विसावे,अश्या विविध भाविक भक्तांनी वरचढ बोली बोलुन वहनास बैलजोडी जुंपण्याचा मान मिळवला सदर कार्यक्रमा प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष गुलाबराव वाघ,कार्याध्यक्ष जिवनसिंह बयस, सचिव प्रशांत वाणी,खजिनदार किरण वाणी,सहसचिव अशोक येवले यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.मंडळाचे सदस्य भानुदास विसावे यांनी वहनाचा जाहीर जोडीचा लिलावाची महत्वपूर्ण कामगिरी बजावली. कार्यक्रम शांतता व सुव्यवस्थे साठी पोलीस निरीक्षक देसले साहेब व त्यांच्या सहकारीचा बंदोबस्त चोख होता