माझी वसुंधरा अभियानात अमळनेर नगरपरिषद नाशिक विभागात प्रथम

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ दरम्यान झालेल्या माझी वसुंधरा ४.० अभियांनातर्गत नाशिक विभागातून अमळनेर नगरपरिषदेने प्रथम क्रमांक मिळवला असून जळगाव जिल्ह्यात सर्वोत्तम ठरली आहे. तर राज्यात 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या गटात अमळनेर नगरपरिषदेचा राज्यात 7 वा क्रमांक आलेला आहे. माझी वसुंधरा अभियान 3.0 मागील वर्षी अमळनेर नगरपालिकेचा 50 ते 1 लाख लोकसंख्या गटात 15 वा क्रमांक आलेला होता. ५० हजार ते १ लाख लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदेत नाशिक विभागात अमळनेर नगर परिषद प्रथम तर खान्देशातीलच शिरपूर वरवाडे नगर परिषदेस द्वितीय क्रमांक मिळाला आहे. अमळनेर नगर परिषदेत एकूण 75 लाख एवढे बक्षीस रक्कम मिळणार आहे.

अमळनेर नगरपरिषदेला मिळालेल्या बक्षिसाबद्दल प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार नेरकर व तत्कालीन मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत सरोदे माझी वसुंधरा अभियान 4.0 नोडल अधिकारी व स्वच्छता निरीक्षक संतोष बिराडे व तत्कालीन नोडल अधिकारी संजय चौधरी, तत्कालीन बांधकाम अभियंता श्री अमोल भामरे, तत्कालीन उपमुख्य अधिकारी संदीप गायकवाड, बांधकाम अभियंता श्री दिगंबर वाघ, तत्कालीन विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर, पाणीपुरवठा अभियंता प्रवीण कुमार बैसाणे तसेच तत्कालीन आरोग्य निरीक्षक हैबतराव पाटील, प्रभागातील सर्व मुकादम, सर्व सफाई कर्मचारी, माझी वसुंधरा टीम – गणेश ब्रम्हे, अनंत संदानशिव, आनंद बिऱ्हाडे, गौतम बिऱ्हाडे, महेंद्र बिऱ्हाडे, शाम करंदीकर, युनूस शेख शहर समन्वयक गणेश गढरी व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Protected Content