‘या’ दिवशी खात्यात येईल पीएम किसान सन्मान योजनेच्या १८ व्या हफ्त्याची रक्कम

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या १८ व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ ऑक्टोबरला वर्ग होईल. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते केले जाईल. १८ व्या खात्याची रक्कम येत्या ५ ऑक्टोबरला जारी करण्यात येणार असल्यासंदर्भातील माहिती पीएम किसानच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. मात्र, पीएम किसानच्या 18 व्या हप्त्याची रक्कम नेमक्या कोणत्या राज्यात कार्यक्रम आयोजित करुन वर्ग केली जाणार यासंदर्भातील समोर आलेली नाही.

पीएम किसान सन्मान योजनेचा 18 हप्ता शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरला मिळणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना 17 हप्त्यांची रक्कम देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनं ही योजना 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केली होती. दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यात 6 हजार रुपये पाठवले जातात. जून महिन्यात 17 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आली होती. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये 18 व्या हप्त्याची रक्कम कधी याची उत्सुकता लागून राहिलेली होती.

शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेतर्फे आतापर्यंत 17 हप्त्यांचे 34 हजार रुपये मिळाले आहेत. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी आणि खरीप हंगामाच्या सुगीची काम सुरु असताना शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम जमा होणार आहे.

Protected Content