यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आदिवासी पारधी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कार्यकारिणी बैठक संपन्न होवुन संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी मुकेश साळुंके यांची पुनश्च निवड करण्यात आली असून याच बरोबर राज्य कार्यकारणी व राज्यातील जिल्हा अध्यक्षांची देखील निवड करण्यात आली आहे . जळगाव येथे राधाकृष्ण मंगल कार्यालयात येथे दि.२२ सप्टेंबर रविवार रोजी आदिवासी पारधी संघटनेची महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीची कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून बैठकीची सुरुवात करण्यात आली व तसेच आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राज्य संघटकपदी निवड झाल्या बद्दल सर्व पारधी समाज बांधवांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी आदिवासी पारधी क्रांती संघटना राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते प्रदेशाध्यक्ष पदी मुकेश साळुंके, महासचिव दिपक खांदे (सुर्यवंशी), राज्य उपाध्यक्ष भगवानसिंग सोळंके,राज्य उपाध्यक्ष सुनिल पवार, राज्य सचिव सुनिल दाभाडे ,राज्य संघटक जितेंद्र शिसोदे,राज्य सचिव सुरेश सोनवणे, जेष्ठ सल्लागार रमेश साळुंखे, राज्य सचिव अमोल सुर्यवंशी, राज्य सचिव सचिन साळुंके, जेष्ठ सल्लागार मोहन पारधी,राज्य संघटक अंबरसिंग चव्हाण,खान्देश अध्यक्ष विनोद साळुंके विदर्भ अध्यक्ष महेश खांनदे, नाशिक जिल्हाध्यक्ष धीरज राणे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष विनोद डाबेराव,धुळे जिल्हाध्यक्ष कमलेश चव्हाण , राज्य प्रसिद्धी प्रमुख रविंद्र आढारे,जेष्ठ सल्लागार बन्सीलाल पवार, जेष्ठ सल्लागार वाल्मिक पवार, जेष्ठ सल्लागार डि एल साळुंके सर,महिला आघाडी खान्देश अध्यक्षा सुशिला ताई सोनवणे, महिला आघाडी मुंबई अध्यक्षा प्रभावती ताई साळुंखे, मुंबई अध्यक्ष कृष्णा पारधी, जळगावआरोग्य दूत समाधान पवार, धुळे जिल्हा आरोग्य दूत अशोक पारधी,अकोला जिल्हाध्यक्ष सुरेश सोळंके,राज्य सचिव ज्ञानेश्वर राठोड,पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख, सुरेश डाबेराव,महिला आघाडी बुलढाणा जिल्हाध्यक्ष शैला भोसले, खान्देश प्रसिद्धी प्रमुख विशाल पवार, धुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिनेश चव्हाण, नाशिक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भुषण पवार, हिंगोली जिल्हाध्यक्ष सुरज पवार,परभणी जिल्हाध्यक्ष गोविंद पवार,जळगाव महिला आघाडी जिल्हाध्यक्ष चेतना पवार, अहमदनगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वालचंद काळे उप जिल्हाध्यक्ष अनिल बबनराव पिंपळे, राहुल पिंपळे,शंकर काळे, अहमदनगर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष छाया भोसले,उप जिल्हाध्यक्ष वंदना काळे इत्यादी पदाधिकारी यांची राज्य,जिल्हा,तालुका कार्यकारिणीवर निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साळुंके,स्वप्नील शिसव व प्रास्ताविक जितेंद्र शिसोदे यांनी केले व उपस्थितांचे आभार सुनिल दाभाडे यांनी मानले, यावेळी उपस्थित शामकांत चव्हाण,सतिष भाऊ चव्हाण,संदिप माळे,गणेश राणे, राजेंद्र दाभाडे,राहुल शेले कमलेश माळे, विजय चव्हाण, विजय साळुंके,विजेंद्र साळुंके बाबुलाल खांदे,रमेश साळुंखे,मगन सोनवणे,आकाश पारधी, विजय साळुंके, किरण दाभाडे, लक्ष्मण साळुंके, प्रकाश पारधी, राजेंद्र शिंदे, विजय चव्हाण, बबलू चव्हाण, लक्ष्मण,उदेश पारधी,साळुंके,चंद्रकांत साळुंके, संजय पवार (मच्छीवाले) धनराज पारधी, रमेश पवार, पंडित चव्हाण, वैशाली शिंदे, दिक्षा पवार, दिपाली चव्हाण, मनिषा पवार, संगिता पवार, इत्यादी पदाधिकारी व पारधी समाज बांधवांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला