बदलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापुरातील नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत आरोपी गंभीर जखमी झाला असून त्याला वाचवताना एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे.
ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना अक्षय शिंदेंने पोलीसांची बंदूक हिसकावून घेत स्वत:वर गोळी झाडली. यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला आहे. या वेळी अक्षयला वाचवण्यासाठी गेलेले पोलीस अधिकारी देखील जखमी झाले आहे. अक्षयची प्रकृती गंभीर आहे.
बदलापूर येथील शाळेत केलेल्या अत्याचार प्रकरणाआधी अक्षय शिंदे याच्यावर अन्य दोन बलात्काराचे गुन्हे दाखल होते. बदलापूर प्रकरणात न्यायालयीन कोठडीतून त्याची पोलिसांनी कस्टडी मिळवली होती. त्याला तुरुंगातून पुन्हा पोलीस कस्टडीत नेत असताना हा प्रकार घडला. ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना अक्षयने त्याच्या शेजारी बसलेल्या अधिकाऱ्याची बंदुक हिसकाऊन घेतली आणि स्वत:वर गोळी तीन गोळ्या झाडल्या. तळोजा तुरुंगातून त्याला बाहेर आणत असताना हा प्रकार घडला आहे. अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत एक पोलिस अधिकारी देखील जखमी झाल्याचे समजते