मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील 14 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण होणार असल्याची घोषणा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली आहे. सरकारने या सर्व औद्योगिक संस्थांना थोर समाजसुधारकांची नावे दिली. त्यातील जळगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना कोणत्याही प्रकारची नावे नाहीत. त्या अनुषंगाने 14औद्योगिक संस्थांचे नाव बदल व्हावे यासाठी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील 14 शासकीय औद्योगिक संस्थांना थोर समाजसुधारकांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली असल्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जळगाव व्यतिरिक्त राज्यातील १४ शासकीय औद्योगिक संस्थांची नावे पुढीलप्रमाणे-
ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबईतील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेडे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड येथील कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार येथील भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला येथील महात्मा ज्योतिबा फुले, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती येथील संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी येथील दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
नवी मुंबईतील दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला येथील महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव येथील आचार्य विद्यासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था.