उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उसने दोन लाख रूपये परत लवकर देण्याचे सांगितल्यावरून एका तरूणाला तीघांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश मांगिलाल ओझा वय २५ रा. प्रजापत नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. केर्टस चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी नंदकिशोर रामगोपल तिवारी रा. उस्मानिया पार्क जळगाव यांना उसनवारीने २ लाख रूपये दिलेले आहे. दरम्यान बुधवारी १८ सप्टेंबर रोजी दिनेश ओझा हे नंदकिशोर रामगोपाल तिवारी यांच्यासोबत गप्प मारत असतांना दिनेश ओझा यांनी सांगितले की, मी तुला दिलेले २ लाख रूपये मला लवकर परत कर असे बोलले. या रागातून नंदकिशोर रामगोपाल तिवारी, कैलास देविलाल उपाध्ये रा. पटेल नगर, जळगाव, आणि राहूल पाटील रा. राजाराम नगर, जळगाव यांनी तिघांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी दिनेश ओझा यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता मारहाण करणारे नंदकिशोर रामगोपाल तिवारी, कैलास देविलाल उपाध्ये रा. पटेल नगर, जळगाव, आणि राहूल पाटील रा. राजाराम नगर, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content