राष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड रावेरच्या तीन खेळाडूंची निवड

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ! नागरगोटा (हिमाचल प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय युथ, ज्युनिअर, आणि सिनिअर वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा वेटलिफ्टींग संघटनेचे खेळाडू तीन विद्यार्थाची निवड झाली आहे. ही स्पर्धा दि ६ ते १३ ऑक्टोबर २०२४ दरम्याण होणार आहे.छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेत या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांची निवड निश्चित झाली आहे.

वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी खेळाडू रोहन भालेराव (मस्कावद पियुष महाजन व प्रणित महाजन दोन्ही रावेर येथील श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय जिमखाना हॉलमध्ये प्रशिक्षक संदिप महाजन, क्रिडा शिक्षक अजय महाजन, आणि क्रिडा शिक्षक युवराज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. या सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवण्याची अपेक्षा जिल्हा वेटलिफ्टींग संघटनेचे मुख्य प्रशिक्षक, पोलीस हवालदार योगेश महाजन (फैजपूर पो.स्टे.) यांनी व्यक्त केली आहे.

निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रकाश मुजुमदार, सचिव संजय मिसर, पदाधिकारी प्रदिप मिसर, प्रकाश बेलस्कर, राजेश शिंदे, यशवंत महाजन, आणि अमोद महाजन यांनी अभिनंदन केले.

Protected Content