जे. टी.महाजन इंजीनियरिंग कॉलेजमध्ये अभियंता दिनानिमित्त ऑनलाइन वेबिनार

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर येथील जे.टी.महाजन इंजीनियरिंग कॉलेजने अभियंता दिनानिमित्त 15 सप्टेंबर 2024 रोजी “2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी भावी अभियंत्यांची भूमिका” या विषयावर ऑनलाइन वेबिनार चे आयोजन करण्यात आले. आपण भारतीय अभियांत्रिकीतील प्रणेते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा आणि जगभरातील अभियंत्यांच्या योगदानाच्या अनुषंगाने दरवर्षी अभियंता दिन साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना त्यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले व त्यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली.

या ऑनलाईन वेबिनारसाठी विजेंडो व क्यू रियल टेक्नॉलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीचे संस्थापक इंजिनीयर पंकज अत्तरदे यांनी मार्गदर्शन केले. त्यात अभियंते म्हणून आपली राष्ट्रनिर्मितीसाठी काय जबाबदारी आहे हे सांगताना सर्वप्रथम समाजातील समस्या अवगत करून त्या समस्या सोडवणारे इंजिनीयर बना. आपल्या व्यवसायासाठी सर्जनशीलता,अचूकता आणि समर्पण यांच्या आधारे कल्पनांचे वास्तवात रूपांतर करून आपल्या समाजात महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडा व भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आपलं सकारात्मक योगदान द्यावे असे आवाहन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ जी.ई.चौधरी यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी फक्त कागदावरची डिग्री न घेता आजीवन विद्यार्थी रहावे व नवनवीन तंत्रज्ञान अवगत करावे. तसेच समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकमेकांच्या सामर्थ्याचा फायदा घेऊन एकत्रित काम करा असा सल्ला दिला. यानंतर प्रा.ए.बी. नेहेते यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, मार्तंड भिरुड, सचिव विजय झोपे व सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ आर.डी.पाटील, प्र.प्राचार्य डॉ.के.जी.पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.ई.चौधरी, डॉ.ए.एम.पाटील, डॉ.पी.एम महाजन, तसेच सर्व विभाग प्रमुख डॉ डी.ए.वारके , प्रा. डी.आर.पाचपांडे, प्रा. वाय.आर.भोळे, प्रा.ओ.के. फिरके, प्रा मोहिनी चौधरी उपस्थित होते.

Protected Content