Home Cities जामनेर शिवरायांच्या पुतळ्यासाठी फळ-विक्री संस्थेची जागा सुपुर्द

शिवरायांच्या पुतळ्यासाठी फळ-विक्री संस्थेची जागा सुपुर्द

0
60


शेंदुर्णी,ता. जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील फळविक्री संस्थेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्थेसाठी दोन हजार चौरस फुटांची जागा दान केली आहे.

शेंदुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ भव्य पुतळा व्हावा अशी नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती.पुतळ्याची दर्शनीय व प्रशस्त जागा आवश्यक होती परंतु नगर पंचायतकडे अशी जागा उपलब्ध नव्हती त्यामुळे महाराजांचे पुतळ्याची उभारणी शक्य होत नव्हती. दरम्यान, शेंदुण फळ विक्री संस्थेची जामनेर पाचोरा रोडवर दर्शनीय जागा असून सदर ठिकाणी महाराजांची मोठी शिवसृष्टी निर्माण होऊ शकते म्हणून गावकऱ्यांच्या विनंती वरूण शेंदुण फळ विक्री संस्थेचे चेअरमन संजय दादा गरूड यांनी संचालक मंडळाला विश्वासात घेऊन संस्थेची दोन हजार स्क्वेअर फूट जागा बक्षीस पत्राने शेंदुण नगर पंचायत मुख्याधिकारी विवेक धांडे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी सुपूर्त केली.

यावेळी संस्थेचे व्हॉईस चेअरमन डॉ. किरण सूर्यवंशी, सब रजिस्ट्रार राजू पाटील, माजी उपसरपंच गोविंद अग्रवाल, निलेश थोरात, वेंडर श्रीपाद विसपुते आदी उपस्थित होते. शेंदुणकर नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.


Protected Content

Play sound