महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा ‘टीईटी’ची जाहिरात प्रसिध्द

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 संदर्भात परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आज दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी हे परिपत्रक जाहीर केले आहे. यानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे. दोन पेपर असल्याने सकाळच्या सत्रात एक आणि दुपारच्या सत्रात एक असे परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात इ. 1ली ते 5वी व इ.6 वी ते इ.8वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्ती होण्यासाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 9 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ९ सप्टेंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ असणार आहे. परीक्षेचे प्रवेश पत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेण्यासाठी दिनांक 28 ऑक्टोबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 एवढा कालावधी मिळणार आहे. १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी साडेदहा ते एक दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक होणार आहे त्यानंतर दुपारच्या सत्रात दोन ते साडेचार दरम्यान पेपर क्रमांक दोन होणार आहे.

Protected Content