वारकरी संप्रदायात सेवावृत्ती आजही टिकून : डॉ. जागृती फेगडे

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वारकरी संप्रदायातील कीर्तनात देव, देश यांच्या आराधने सोबत समाजाचीही सेवा करण्याचा उपदेश केला जातो म्हणूनच वारकरी संप्रदाय हजारो वर्षांपासून टिकून आहे असे प्रतिपादन जागृती फेगडे यांनी आज ८ सप्टेंबर रविवार रोजी वाघोड येथे बोलतांना केले.

रावेर तालुक्यातील वाघोड येथील निवासी व विश्व वारकरी सेनेचे प्रांताध्यक्ष ह.भ.प संतोष महाराज वाघोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वारकरी मेळाव्यास डॉ.जागृती कुंदन फेगडे आज उपस्थित राहिल्या. त्यावेळी कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. मेळाव्यास जिल्ह्यातील असंख्य वारकरी ज्येष्ठ कीर्तनकार उपस्थित होते.

या मेळाव्यास असंख्य ज्येष्ठ कार्यकर्तेही उपस्थित होते. सद्गुरु श्री कुवर स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गावी विचारही व्यक्त केले. भागवत धर्माच्या प्रचार प्रसारा साठी अनेक चांगले ठराव या मेळाव्यात सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

Protected Content