एरंडोल विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे अनिल महाजन इच्छूक

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक मंडळी उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातही अनेक इच्छुकांनी उमेदवारीवर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपणास उमेदवारी मिळवी. तसेच, पक्षाचे विद्यमान आमदार आणि नेते एकनाथ खडसे यांनी मनावर घेतले तर आपण सहज विजयी होऊ, असा विश्वास बहुजन नेते अनिल महाजन यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने विविध मतदारसंघातून आढावा घेतला असून, उमेदवारीसाठी इच्छुकांची नावे मागवली आहेत. इच्छुकांनी आपली नावे आपल्या व्यक्तीगत आणि सामाजिक माहितीसह एक अर्ज भरुन ती पक्षाकडे द्यायची आहेत. ही नावे 3 सप्टेंबर 2024 अखेर द्यायची होती. त्यानुसार आपण मतदारसंघातील जनतेच्या आग्रहाखातर पक्षाकडे उमेदवारी मागितल्याचे अनिल महाजन यांनी म्हटले आहे.

अनिल महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, एरंडोल आणि पारोळा हा मतदारसंघ पाठिमागील कैक वर्षांपासून विकासापासून वंचीत आहे. त्यामुळे या मतदारसंघात जर विकासाची दृष्टीकोण आणायचा असेल तर कार्यक्षम नेतृत्वाची गरज आहे. सध्या या मतदारसंघांची रचना पाहिली तर तो खेड्यात आहे की, शहरात हेच कळत नाही. त्यामुळे मतदारसंघाचा कायापलाट करणे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणनच आपण निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे महाजन म्हणाले.

Protected Content