लाडक्या बहिणींना २००० रूपये देऊ – मल्लिकार्जुन खर्गे

सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे. सरकारने या योजनेचा अधिकाधिक महिलांना लाभ देण्यासाठी सरकारने या योजनेची मुदत दोन वेळा वाढवली आहे.निवडणुकांच्या तोंडावर ही योजना आणल्याची टीका विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केली जात आहे. त्यातच आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगलीत भाषण करताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. आमचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही लाडक्या बहीण योजनेत वाढ करून दोन हजार रुपये महिन्याला करू. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार राहुल गांधी सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, खरी शिवसेना आमच्यासोबत आहे, तसेच खरी राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासोबत आहे. त्यांच्या बाजुने सर्व नकली आहेत. राज्यात आमचं सरकार आल्यास लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, उलट त्यात वाढ करून तुम्हाला २ हजार रुपये देऊ. तुम्ही तुमचा सन्मान मोदींसमोर गहाण ठेवणार आहात का. महाराष्ट्र जिंकला तर संपूर्ण देश जिंकेल आणि लवकरच भाजपाचे सरकार जाईल, असा हल्लाबोल खर्गे यांनी केला.

मोदींवर हल्ला चढवताना खर्गे म्हणाले की, मोदी ज्या गोष्टीला हात लावतात ते पडत आहे. त्यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हात लावला तो पडला,⁠ राम मंदिराला हात लावला ते गळत आहे, गुजराच्या पुलाचे उद्घाटन केले तर तो पुल पडला. मोदी येत आहेत, म्हणून पुतळा लवकर बनवला आणि तो पडला. आरएसएसवाले बनवतात ते पडत आहे. शाळेतील⁠अभ्यासक्रम बदलत आहेत. संविधान बदलत आहेत. आणखी २० जागा काँग्रेसला मिळाल्या असत्या तर मोदी सरकार दिसले नसते, असा मोठा दावा खर्गे यांनी यावेळी केला आहे.

Protected Content