भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सेवानिवृत्त वृध्दाच्या पिशवीतून अज्ञात चोरट्यांनी २२ हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना बुधवारी ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, सपधाकर शंकर शिंपी वय ७९ रा. आनंद नगर भडगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ते भडगाव शहरातील बडोदा बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी बँकेतून २२ हजारांची रोकड काढली. दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची पिशवी कापून त्यातील २२ हजारांची रोकड चोरून नेली. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी सायंकाळी ५ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार इकबाल शेख हे करीत आहे.