वाघूरला पूर : पहूरसह परिसरातील गावांमध्ये शिरले पाणी

पहूर, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अजिंठा पर्वतरांगांमध्ये झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे वाघूर नदीला मोठा पूर आला असून यामुळे नदीचे पाणी पहूरसर परिसरातील गावांमध्ये शिरल्याचे वृत्त आहे.

अजिंठा डोंगर रांगेत काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे वाघुर नदीला आज ( ता . २)सकाळी मोठा पूर आला.पुरामुळे नदी काठावरील असलेल्या वाकोद, हिवरी दिगर, पिंपळगाव, पहूर पेठ,पहुर कसबे येथील घरात व दुकानात पुराचे पाणी घुसल्याने अनेक घरांतील संसारोपयोगी वस्तू वाहुन गेल्या . वाघुर नदीने बऱ्याच वर्षांनी रौद्र अवतार घेतल्याने पाण्याची पातळीत वाढ झाल्याने पहुर पेठ गावातील नदीपात्रातील अतिक्रमित जागेवर दुकानावर पाणी घुसल्याने पहुर पेठ बस स्थानकाकडे जाणाऱ्या बाजारपट्याचा रस्ता दोन तास बंद होता.

पोळा सण असल्यामुळे हिंदू धर्मातील महिला बाजारपेठेत असलेल्या मरीआईला नैवेद्यासाठी महिलांची गर्दी होती .अनेक महिलांना अचानक आलेल्या या पुरामुळे धांदल उडाली . बस स्थानकाकडे जाण्याचे प्रवेशद्वारच बंद झाल्याने गावात पाणी शिरल्यामुळे गावात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मुळे अनेकांनी लोकप्रतिनिधीवर नाराजी व्यक्त केली.

गेल्या काही वर्षापासून ग्रामपंचायत मधील काही सत्ताधारी प्रस्थापित लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नाने नदीकाठी बाजार पट्ट्यात ठराविक ग्रामपंचायत रक्कम भरून दुकाने व घरे बांधकामासाठी खुले केल्याने या अतिक्रमित नदीपात्रात घरे ,दुकाने बांधकाम झाल्यामुळे पहुर पेठ गावाला जाण्या येण्यासाठी रस्ता बंद झाला होता .
माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिणाटे यांनी भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली . यावेळी मदत कार्य वाढवण्यासाठी सूचना केल्या तसेच नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले. यावेळी जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी घराचे व दुकानाची प्रत्यक्ष पाहणी करून लवकरच पंचनामे करून तसेच अतिक्रमित दुकानांना घराला नोटीस दिल्या जाण्याचे सांगितले.

सरपंच अबु तडवी, माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, पत्रकार गणेश पांढरे,रवींद्र मोरे, ईश्वर बारी, किरण पाटील यांच्यासह ग्रामस्थ पूरग्रस्त नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिवरी दिगर येथे वाहून गेलेल्या घरांची पाहणी तहसीलदार नानासाहेब आगळे जे .के . चव्हाण,चंद्रकांत बाविस्कर,रमेश पांढरे,वासुदेव घोंगडे, यांच्यासह सर्व पक्ष पदाधिकारी व नागरिक गावकरी उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेती आणि घरांचे पंचनामे करून या सर्वांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापन पथक पहुर मध्ये दाखल

पूर परिस्थिती आटोक्यात आली असली तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपत्ती व्यवस्थापन पदकास पाचारण करण्यात आले आहे . परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन सज्ज झाले आहे .

Protected Content