भाजपमध्ये प्रवेश पण अधिकृत घोषणा नाही – एकनाथ खडसे

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा वाढदिवस झाला असता जळगावमध्ये कार्यकर्त्यांनी प्लेक्स लावले होते. यात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आल्याने खडसे नेमके कोणत्या पक्षात आहेत हा प्रश्न निर्माण झाला होता. या बाबत स्वत: एकनाथ खडसे यांनी खुलासा केला आहे. या बाबत एकनाथ खडसे म्हणाले, भाजपामध्ये माझा प्रवेश झाला, पण घोषणा झाली नाही, असे खडसे म्हणाले. खडसे यांनी शरद पवार यांच्या बद्दल देखील वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्या यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भाजपामध्ये परतण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष प्रवेश होईल अशी चर्चा होती. मात्र, अद्याप त्यांचा प्रवेश झाला नाही.या बाबत माहिती देतांना खडसे म्हणाले, माझ्या भाजपमध्ये प्रवेश करण्यात यावा, अशी विनंती मी पक्षनेत्यांकडे केली होती. मात्र, मला अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. मी पक्ष प्रवेश केला असला तरी असून माझ्या प्रवेशाची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे मी जूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे.

शरद पवार यांच्या बद्दल बोलतांना एकनाथ खडसे म्हणाले, की शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे. मी भाजपाकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहीन. त्यानंतर मी पुन्हा माझ्या मूळ पक्षात सक्रिय होईल. मी भाजपमध्ये जण्यासाठी प्रयत्न केले. पक्षाकडे तशी मागणी देखील केली. मात्र, भाजपाकडून प्रतिसाद मिळाला नाही. जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपा प्रवेश झाला. मात्र, काही लोकांनी विरोध केल्याने माझा पक्ष प्रवेश जाहिर होऊ शकला नाही. त्यामुळे आता भाजपामध्ये राहणे योग्य होणार नाही. मी राष्ट्रवादीतच राहणार आहे, असे देखील एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या भूमिकेवर भाजप काय निर्णय घेणार या कडे लक्ष लागलेले आहे.

Protected Content