देशात इलेक्ट्रॉनिक्स अभियंत्यांना मिळेल अधिक रोजगार : प्रा. पाटील

Electronics

भुसावळ, प्रतिनिधी | जगातील सर्वात वेगवान विकासशील अर्थव्यवस्थांपैकी भारत एक आहे, उत्पादनाच्या बाबतीत स्पर्धात्मक इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात भारत मागे होता. परन्तु आता ‘मेक इन इंडिया’ आणि डिजिटल इंडियाची व्याप्ती वाढल्याने देशात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन वाढविले आहे. अशी माहिती इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इंजिनियर्सचे समन्वयक प्रा.गजानन पाटील यांनी भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीमध्ये आयोजित ‘५ जी युगाला आवश्यक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन वाढ’ या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी दिली.

 

दोन सत्रात झालेल्या या विभागीय कार्यशाळेत डॉ.गिरीश कुळकर्णी, प्रा.अनंत भिडे, प्रा.धीरज अग्रवाल, प्रा.सुलभा शिंदे, प्रा.नीता नेमाडे, प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.दीपक खडसे, प्रा.निलेश निर्मल, प्रा.दीपक साकळे, प्रा.धीरज पाटील यांनी सहभाग नोंदवला होता.

प्रत्येक क्षेत्रात उत्पादन वाढणार:- रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर्स, मायक्रोवेव्ह इत्यादीसारख्या घरगुती उपकरणे यूपीएस सिस्टम, पर्यवेक्षी नियंत्रण आणि डेटा अधिग्रहण तसेच प्रोग्राममेबल लॉजिक कंट्रोलर्स यासारख्या औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्सचे उत्पादन वाहन चालविण्याच्या आधुनिकीकरण, ऑटोमेशन आणि रोबोटिक्ससह, सौर फोटोव्होल्टेक्स, सेमीकंडक्टर्स, कॅपेसिटर्स, प्रतिरोधक, चित्र-ट्यूब, एक्स-रे नलिका, कॅथोड किरण नलिका यासह ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स, आयटी उत्पादने, सौर ऊर्जा, हेल्थकेअर सेक्टर, एलईडीएस, टेलिकॉम आणि कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, उपग्रह-आधारित संप्रेषण, नेव्हिगेशन आणि निगरानी प्रणाली, सोनार, अंडर वॉटर इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स, रडार आणि इन्फ्रा-रेड, एलओटी, सेन्सर, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, वर्च्युअल रियलिटी, ड्रोन, रोबोटिक्स, नॅनोटेक-आधारित डिव्हाइसेस, फेबलेस चिप डिझाइन, वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स, मोबिलिटी आणि स्ट्रॅटिक इलेक्ट्रॉनिक्ससाठी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या सर्वच क्षेत्रातील उत्पादन वाढणार आहे.

Protected Content