जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट टाकून भावना दुखावल्याची घटना शुक्रवारी ३० ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुलतान सलीप पटेल वय २६ हा तरूण आपल्या परिवारासह बळीराम पेठ येथे वास्तव्याला आहे. त्याने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्यावर अनिल नानकराम मकेरिया आणि नचिकेत जखेटीया दोन्ही राहणार जळगाव यांनी फेसबुकवरील पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट करून भावना दुखावल्याची घटना शुक्रवारी ३० ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी सुलतान पटेल यांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता शहर पोलीस ठाण्यात दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरतसिंग पाटील हे करीत आहे.