यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील तहसील कार्यालयातील दलालांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
येथील तहसील कार्यालयात दलाल व काही भ्रष्ट कर्मचारी यांच्या संगनमताने वाढत्या आर्थिक गोंधळामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या शिधापत्रीकेच्या कामाकडे कार्यालयातील अधिकारी हे दुर्लक्ष करीत आहेत. या दलालांचा व भ्रष्ट कर्मचारी यांचा बंदोबस्त तात्काळ तहसीलदार यांनी करावा या मागणी करीता शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी आपल्या सहकार्यांसोबत तहसील कार्यालयाच्या दालनात बसुन आंदोलन केले.
यावलच्या तहसील कार्यालयातील काही कर्मचारी व धान्य सुरू करून देतो असे सांगुन नागरीकांची आर्थिक लुट करणारे दलाल यांचे संगनमत झाल्याने आर्थिक स्वार्थासाठी हेतुपुरस्पर खऱ्या गरजु लाभार्थ्यांकडे प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष करण्यात येत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे जळगाव जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी तहसील कार्यालयात आंदोलन केले.
याप्रसंगी गोरगरीब महिलांना न्याय मिळावा म्हणुन तहसील कार्यालयात महसुल अधिकारी यांच्यासमोर प्रश्न मांडलेत. यावेळी महसुल प्रशासनाच्या माध्यमातुन यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तात्काळ या सर्व गरजु शिधा पत्रीका धारकांना धान्य मिळावे या करीता योग्य न्याय मिळून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांना यावेळी सांगुन आश्वासित केले.
यावेळी शिवसेना ( शिंदे ) गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांच्यासह पक्षाचे यावल शहरप्रमुख पंकज बारी, शहर उपप्रमुख सागर सपकाळे, ईस्माईल तडवी, राजु बारी ,कैलास भोई, किशोर तेली, सागर सपकाळे, राजु सपकाळे, ईरफान तडवी, पिंटू भडकल, बंटी सोनवणे यांच्यासह शिवसेना ( शिंदे ) गट पक्षाचे विविध पदाधिकारी व शिधा पत्रीकाधारक महिला मोठया संख्येत उपस्थित होत्या.