भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील मकरंद येथील विवाहितेला घर व गाडी घेण्यासाठी माहेराहून १ लाख रूपये आणावे नाहीतर बंदूकीने ठार मारेल अशी धमकी देत शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवार २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिक्षा दिपक नाटेकर वय २६ या महिला आपल्या पती दिपक नाटेकर व सासू मंदाबाई नाटेकर यांच्यासोबत मकरंद नगरात वास्तव्याला आहेत. दिक्षा नाटेकर यांचे पती दिपक मल्लेश नाटेकर याने विवाहितेला घर व गाडी घेण्यासाठी माहेराहून १ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. त्यानंतर विवाहितेला हेल्मेट व पट्ट्याने बेदम मारहाण करून धमकी दिली. तसेच माहेराहून पैसे आणले नाही तर गावठी पिस्तूलाने ठार मारेल अशी धमकी दिली. तसेच विवाहितेची सासू मंदाबाई मल्लेश नाटेकर यांनी देखील पैशांसाठी छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवार २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पती दिपक मल्लेश नाटेकर आणि सासू मंदाबाई मल्लेश नाटेकर दोन्ही राहणार मकरंद नगर, भुसावळ याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ तेजस परिस्कर हे करीत आहे.