मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल तथा समता फाउंडेशन तर्फे भव्य विनामूल्य डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. २३ ते २४ ऑगस्ट दरम्यान सर्व विद्यार्थी तथा पालकांकरिता भव्य डोळे तपासणी विनामूल्य शिबिराचे आयोजन शाळेतर्फे तथा समता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले होते या शिबिराचा लाभ तज्ञ डॉक्टरांच्या तपासणी व मार्गदर्शना खाली शाळेतील एकूण ७५० विद्यार्थ्यांनी, विद्यार्थिनींनी,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तथा बहुसंख्य पालकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल विद्यार्थ्यांच्या बहुआयामी विकासाकरिता अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम राबविण्यात सदैव अग्रेसर असलेली शाळा आहे. या उपक्रमाचे आयोजन समता फाउंडेशन यांच्या साह्याने करण्यात आलेले होते शिबिराचे विशेष म्हणजे विद्यार्थी पालक व परिसरातील नागरिकांकरिता विनामूल्य तपासणी डोळ्यांचा नंबर असल्यास विनामूल्य चष्मा तथा मोतीबिंदू व इतर डोळ्यांचे विकार किंवा ऑपरेशन संदर्भ तील बाब असेल तर विनामूल्य डोळ्याचे ऑपरेशन सुद्धा या शिबिरांतर्गत करण्यात येणार होते म्हणून बहुसंख्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी तथा परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा उत्स्फूर्तपणे शाळेच्या आनंदमय वातावरणात डॉक्टर राहुल पवार विजन टेक्निशियन व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडण्यास संस्थेचे तथा सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विशेष सहाय्य लाभले तर कार्यक्रमाच्या प्रारंभी समता फाउंडेशन च्या सर्व डॉक्टर व सहकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेचे मुख्याध्यापक व्ही. के. वडस्कर यांनी त्यांचा सत्कार केला आणि कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहकाऱ्यांचे सहृदयापासून आभार व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका सौ. सारिका मानके मॅडम व आभार प्रदर्शन वैभव पाटील सर यांच्याकडून करण्यात आले.