जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ए.बी. पार्क परिसरात महिलेचे बंद घर फोडून घरातून ७१ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता समोर आलीआहे. या संदर्भात मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, भाग्यश्री संदीप जोहरे वय-३५, रा. ए.बी.पार्क, जळगाव, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. 22 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराच दरवाजाचे कूलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ७१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता समोर आली आहे. या संदर्भात भाग्यश्री जोहरे यांनी रामानंदनगर पोलिसात धाव घेवून पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेल सुशील चौधरी हे करीत आहे.