चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कन्नड रोडवर एका शेतात बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
या संदर्भात अधिक असे की, कन्नड परिसरातील घनदाट जंगलात काही बिबटे वास्तव्यास आहेत. कन्नड घाट परिसरातील शेतकरी रघुनाथ धनगर हे आज सकाळी नेहमी प्रमाणे गोट्या म्हसोबा परिसरातील आपल्या शेतात गेले असता, त्यांना एका कुत्र्याचा मृतदेह छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळून आला. हा मृतदेह त्यांच्या शेतापासून दोन शेत ओलांडत मधुकर चौधरी यांच्या शेताच्या बांध्यावर असलेल्या झाडामध्ये आढळून आला. प्रथमदर्शी ही शिकार कुत्र्याने केली असल्याचे वनविभागाच्या कर्मचारींचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे संजय जाधव, गणेश गवळी, प्रवीण गवारे हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बिबट्याच्या पायाचे ठसेंचे फोटो घेतले आहेत.
यावेळी वन विभागच्या कार्मचारींच्या वतीने शेतकऱ्यांना जागृतीपर परिपत्रक देखील वाटण्यात आले.